पिंपरी (Pclive7.com):-
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे सुधारित आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केलेत. शहरातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
महापालिका आयुक्तांचे सुधारित आदेश खालील प्रमाणे..
● १. कलम १४४ आणि रात्री संचारबंदी लाग करणे.
a. पिंपरी चिंचवड संपुर्ण कार्यक्षेत्रासाठी कलम १४४ लागू करणेत येत आहे.
b. सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७:०० ते संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करणेत येत आहे.
c. या व्यतिरीक्त (सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ०६:०० ते सकाळी ०७:०० व शुक्रवार संध्याकाळी ०६:०० ते सोमवार सकाळी ०७:०० वाजेपर्यंत) खाली दिलेल्या वैध कारणां शिवाय किंवा वैध परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी सर्व व्यक्तींना मनाई करणेत येत आहे.
d. वैद्यकीय आणि इतर जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली असुन त्यांचे वाहतुकीला निबंध असणार नाहीत.
■ e. खालील सेवांचा अंतर्भाव जीवनावश्यक सेवा म्हणुन करणेत येत आहे.
i. रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाना, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा.
ii. किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळे विक्रेते, दुग्धालये, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने
i. सार्वजनिक वाहतुक – रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस,
iv. विविध देशांच्या राजदूत कार्यालयाशी संबंधित सेवा
v. पिंपरी चिंचवड महागरपालिकेचे मान्सून पूर्व उपक्रम
vi. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवा
vii. वस्तुंची वाहतुक vi. शेती विषयक कामे
ix. ई-कॉमर्स सेवा
x. मान्यताप्राप्त माध्यम सेवा
xi. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अत्यावश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा
xii. माहिती तंत्रज्ञान विषयक अत्यावश्यक सेवा (जास्तीत जास्त २०% कर्मचारी संख्येने सर्व्हर देखभाल दुरुस्ती सारख्या अति महत्वाच्या सेवा चालविण्यात याव्यात. बाकी सर्व काम धरुनच करण्याविषयी (work from home) संबंधित कंपनीच्या मनुष्यबळ अधिका-याने खबरदारी घ्यावी.)
xii, पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
xiv. सर्व कुरीअर / कार्गो सेवा
xv. डेटा सेटर्स, क्लाउड सर्व्हिसेस सबंधी सेवा ।
xvi, पायाभूत सुविधा आणि महत्वाच्या सेवांना आधार देणारी आयटी सेवा.
xvii. सरकारी व खाजगी सुरक्षा यंत्रणा
f. खालील खाजगी संस्थांना भारत सरकारच्या निकषानुसार कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्याचे लवकरात लवकर लसीकरण करणेत येईल. या अटीवर कार्यालय आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ०७:०० ते संध्याकाळी ०६:०० वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी असेल. सर्व कर्मचारी यांनी भारत सरकाचे निकषांनुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. तसेच ज्या व्यक्तींचे लसीकरण झालेले नाही त्यांचेकडे १५ दिवसांसाठी ग्राह्य असलेले आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील, सदरचा नियम दिनांक १० एप्रिल २०२१ पासून लागू राहील, जर वरीलपैकी कोणीत्याही व्यक्तीजवळ नकारात्मक आरटीपीसीआर प्रमाणपत्र न मिळाल्यास/लसीकरण न केलेले आढळल्यास त्यास रक्कम रुपये १०००/- दंड आकारुन वसुल केला जाईल,
i. सेबी आणि सेबीची कार्यालये, स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि सेबी नोंदणीकृत मध्यस्थ यासारख्या बाजाराच्या पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या संस्थां.
ii. आरबीआय द्वार चालविल्या जाणाऱ्या संस्था, स्टैंडअलोन प्राइमरी डीलर्ससह मध्यस्थ, CCIL, NPCL, payment system operators, आर्थिक बाजार, बाजारामध्ये भाग घेणारे आरबीआय मार्फत नियमित सहभागी.
iii. सर्व नॉन-बँकिंग वित्तीय कॉर्पोरेशन / संस्था
iv. सर्व मायक्रो फायनान्स संस्था
v. वकिलांची कार्यालये
vi. कस्टम हाऊस एजंट्स, लस / जीवनरक्षक औषधे / फार्मास्युटिकल उत्पादनांच्या वाहतुकीशी संबंधित परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर
g. आठवड्याचे सर्व दिवस वैध तिकीटाच्या आधारे विमानतळ / ट्रेन / बस / येथ जाणाऱ्या व तेथुन येणाऱ्या व्यक्तीस परवानगी असेल.
h. कंपनी ओळखपत्राचे आधारे संध्याकाळी ०६:०० ते सकाळी ०७:०० वाजेपर्यंत तसेच शनिवार व रविवार या दिवशी खाजगी बस अथवा वाहनाने प्रवास करणारे औद्योगीक क्षेत्रातील कामगारांना परवानगी राहील.
i. धार्मिक स्थळे / उपासनेची ठिकाणे पुर्णत: नागरिकांसाठी बंद आहेत. परंतु तेथे कामकाज करणाऱ्या व्यक्तींना तेथे कामकाज करणेची मुभा राहील, धार्मिक स्थळी कोणतेही लग्न / अंतिम संस्कार होणार असल्यास, ४ एप्रिल २०२१ च्या शासकीय आदेशानुसार विवाहसोहळा / अंतिम संस्कारांच्या संदर्भात दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून फक्त त्याच उद्देशास परवानगी देण्यात येईल.
j. वैध प्रवेश पत्राचे आधारे कोणत्याही परीक्षेस जाणाऱ्या व परीक्षेवरुन येणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळी ०६:०० नंतर परवानगी राहील.
k. शनिवार व रविवार या दिवशी असणाऱ्या पुर्वनियोजीत लग्न समारंभाचे बाबतीत ४ एप्रिल २०२१ च्या शासकीय आदेशानुसार विवाहसोहळा संदर्भात दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून ज्या त्या प्रभाग क्षेत्रिय कार्यालयाने व संबधीत पोलिस स्टेशनने त्या वेळची कोविड – १९ बाबतची परिस्थीती पाहून परवानगी देण्याची कार्यवाही करावी.
● २. सार्वजनिक ठिकाणे
a. आठवड्यातील सर्व दिवशी सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने, क्रिडांगणे बंद राहतील.
● ३. दुकाने, बाजारपेठा व मॉल
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि मॉल्स दिवसभर बंद राहतील.
a. अत्यावश्यक दुकानाचे परिसरात ग्राहकांमधील सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील. दुकानाचे परिसरात ग्राहकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राखण्यासाठी चिन्हांकित खुणा करून त्याठिकाणी ग्राहकांना थांबवावे.
b. भारत सरकारचे निकषांनुसार जीवनावश्यक वस्तू दुकानांचे मालक आणि सर्व दुकानांवर काम करणान्या व्यक्तींनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
C. सर्व दुकानदारांनी पारदर्शक काचेचे किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादीद्वारे ग्राहकांशी संवाद साधण्यासारख्या सुरक्षा उपायांचे पालन करावे. जेणेकरुन कोविड १९ च्या प्रसाराची कोणतीही भीती न बाळगता सर्व दुकाने पुन्हा सुरू करणे शक्य होईल.
● ४. सार्वजनिक वाहतुक
पुढील प्रतिबंधांसह सार्वजनिक वाहतूक पुर्णपणे कार्यान्वित राहील
▪ रिक्षा – चालक + दोन प्रवासी
▪ टॅक्सी – चालक + वाहनाच्या ५०% क्षमेते एवढे प्रवासी
▪ बस – आरटीओ ने मान्य केलेली आसन क्षमता, परंतु उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल,
a. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींनी योग्य प्रकारे मास्क (मुखपट्टी) परीधान करणे आवश्यक राहील, योग्य प्रकारे मास्क परीधान न केल्यास रक्कम रुपये ५००/- दंड आकारुन वसुल केला जाईल.
b. टॅक्सीमध्ये जर एखाद्याने योग्य प्रकारे मास्क (मुखपट्टी) परीधान केला नसेल तर, तो व्यक्ती आणि चालक या दोन्ही व्यक्तींना प्रत्येकी रक्कम रुपये ५००/- दंड आकारुन बसुल केला जाईल.
c. प्रत्येक फेरी नंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
d. सर्व सार्वजनिक परिवहन चालक आणि इतर कर्मचारी यांनी भारत सरकाचे निकषांनुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. तसेच ज्या व्यक्तींचे लसीकरण झालेले नाही त्यांचेकडे १५ दिबसांसाठी ग्राह्य असलेले आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील. सदरचा नियम दिनांक १० एप्रिल २०२१ पासुन लागु राहील, तथापि, ड्रायव्हर प्लास्टिकच्या शीटद्वारे स्वत:ला अलग ठेवत असल्यास त्याला किंवा तिला या आवश्यकतेमधून सूट दिली जाईल.
e. जर वरीलपैकी कोणीत्याही व्यक्तीजवळ नकारात्मक आरटीपीसीआर प्रमाणपत्र न मिळाल्यास / लसीकरण न केलेले आढळल्यास त्यास रक्कम रुपये १००० दंड आकारुन वसूल केला जाईल.
f. रेल्वे मधुन प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी योग्य प्रकारे मास्क परिधान करणे आवश्यक राहील. तसेच रल्वेच्या अनारक्षित डब्यांमधुन उभे राहुन प्रवास करणेस मज्जाव असेल.
g. सर्व प्रकारच्या रेल्वे मधुन प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी योग्य प्रकारे मास्क परिधान न केल्यास त्यास रक्कम रुपये ५००/- दंड आकारुन वसुल केला जाईल, याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील.
● ५. कार्यालये
a. खालील नमुद केलेली कार्यालये वगळता सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.
i. सर्व सहकारी, सरकारी व खाजगी बँका
ii. विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्या
iii. दूरसंचार सेवा देणाऱ्या संस्था
iv. विमा/ आरोग्य विमा कंपन्या
v. उत्पादन व वितरणाच्या व्यवस्थापनासाठी फार्मास्युटिकल कंपन्यांची कार्यालये
b. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी कार्यालये ५०% मनुष्यबळासह सुरु ठेवता येतील. तसेच कोविड १९ संबधित काम करणा-या शासकीय निमशासकीय कार्यालया बाबतीत त्यांचे कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे १००% उपस्थिती बाबत निर्णय घ्यावा. मात्र त्यांनी कोविड – १९ संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
c. वीज, पाणी, बँकिंग आणि इतर वित्तीय सेवा संबंधित सरकारी कंपन्या व सर्व सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेसह कार्यरत राहतील.
d. शासकीय कार्यालये तसेच सरकारी कंपन्यांच्या बाबतीत, त्यांचे आवारात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणातीही बैठक ऑनलाईनच आयोजित करण्यात यावी.
e. सरकारी कार्यालये तसेच सरकारी कंपन्यांमध्ये कोणत्याही अभ्यागतांना प्रवेश राहणार नाही. सरकारी कार्यालये तसेच सरकारी कंपन्यांनी ई-व्हिजिटर सिस्टम सुरू करावी.
f. अपवादात्मक परिस्थितीत सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश करावयाचा असल्यास मागील ४८ तासांचे आतील नकारात्मक आरटीपीसीआर अहवाल असणाऱ्या अभ्यागतांना विभाग प्रमुखांचे परवानगीने प्रवेश देण्यात येईल.
g. सर्व खाजगी आणि सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भारत सरकारचे निकषांनुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, जेणेकरुन कोविड १९ च्या प्रसाराची कोणतीही भीती न बाळगता सर्व कार्यालये पुन्हा सुरू करणे शक्य होईल.
● ६. खाजगी वाहतुक
सर्व प्रकारच्या खासगी बसेससह खासगी वाहने सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७:०० ते संध्याकाळी ०६:०० पर्यंत चालु राहतील. तसेच फक्त आपत्कालीन किंवा अत्यावश्यक सेवांच्या उद्देशाने उर्वरित कालावधीसाठी सुध्दा चालु राहतील खालील प्रतिबंधासह खाजगी वाहतुक कार्यान्वित राहील.
a. फक्त आसन क्षमते एवढे प्रवासी असणे आवश्यक राहील तसेच उभे राहणारे प्रवासी अनज्ञेय नाहीत.
b. खाजगी बसने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भारत सरकारचे निकषानुसार लवकरात लवकर कोविड १९ लसीकरण करुन घ्यावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे, तसेच ज्या व्यक्तींचे लसिकरण झालेले नाही त्यांचेकडे १५ दिवसांसाठी ग्राह्य असलेले नकारात्मक आरटी- पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील, सदरचा नियम दिनांक १० एप्रिल २०२१ पासुन लागू राहील.
● ७. मनोरंजन आणि करमणूक
a. सिनेमागृह (Single Screen and Multiplex) नाट्यगृह, मनोरंजन पार्क, अम्यूजमेंट पार्क / आर्केड्स, व्हिडीओ गेम पार्लर, वॉटरपार्क, स्विमिंगपूल, व्यायामशाळा (जिम), क्रीडा संकुल (Sports Complex) /क्लब इ. आस्थापना संपूर्णत: बंद राहतील.
b. या आस्थापनांशी संबंधित सर्व व्यक्तींनी भारत सरकारचे मार्गदर्शक सुचने प्रमाणे लवकरात लवकर कोविड १९ लसीकरण करुन घ्यावे जेणेकरुन कोविड १९ च्या प्रसाराची कोणतीही भीती न बाळगता सर्व पुन्हा सुरू करणे शक्य होईल.
c. चित्रपट/मालिका/ जाहिरातींचे शूटिंग खालील अटीचे अधीन राहून अनुज्ञेय राहील
i. शक्यतो मोठ्या संख्येने कलाकारांसह दृश्यांचे शूटिंग टाळण्यात यावे. सर्व कर्मचारी व कलाकारांकडे १५ दिवसांसाठी ग्राह्य असलेले नकारात्मक आरटी- पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
ii, सर्व कर्मचारी व कलाकार यांचेसाठी Quarantine Bubble तयार करण्यात यावा बाबतची परवानगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून घेण्यात यावी.
● ८. रेस्टॉरंट्स, उपहार गृहे, बार, हॉटेल्स
a. राहण्याची सुविधा असलेल्या हॉटेलचा अविभाज्य भाग वगळता संध्याकाळी सर्व रेस्टॉरंट्स आणि बार बंद राहतील.
b. सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७:०० ते संध्याकाळी ०६:०० दरम्यान घरपोच पार्सल सेवा (होम डिलिव्हरी सर्व्हिस) हॉटेलमध्ये जावून पार्सल आणणे (टेक अवे) सुरु राहील, शनिवार व रविवार या दिवशी सकाळी ०७:०० ते संध्याकाळी ०६:०० चे दरम्यान फक्त घरपोच पार्सल सेवा (होम डिलिव्हरी सर्व्हिस) परवानगी राहील. मात्र हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणण्याची सुविधा (टेक अवे) असणार नाही.
c. राहण्याची सुविधा असलेल्या हॉटेलमधील रेस्टॉरंट्स आणि बार केवळ तेथे राहत असणाच्या व्यक्तींसाठी खुले असतील. कोणत्याही परिस्थितीत बाहेरील व्यक्तींना परवानगी दिली जाऊ नये. बाहेरील व्यक्तींसाठी, वर नमूद केल्याप्रमाणे इतर रेस्टॉरंट आणि बारसारखेच निर्बंध पाळले जातील याची दक्षता घ्यावी,
d. घरपोच वितरण सेवेतील (होम डिलिव्हरी सेवा) सर्व कर्मचा-यांनी भारत सरकारचे मार्गदर्शक सूचने प्रमाणे लवकरात लवकर कोविड १९ लसीकरण करुन घ्यावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. तसेच ज्या व्यक्तींचे लसीकरण झालेले नाही त्यांचेकडे १५ दिवसांसाठी ग्राह्य असलेले नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील. सदरचा नियम दिनांक १० एप्रिल २०२१ पासुन लागु राहील.
e. नकारात्मक आरटीपीसीआर प्रमाणपत्र नसलेल्या । वरीलप्रमाणे लसीकरण न झालेल्या व्यक्तीला, १० एप्रिल २०२१ नंतर रक्कम रुपये १०००/- दंड आकारला जाईल आणि संबंधित संस्थेस /आस्थापनेस रक्कम रुपये १०,०००/- दंड आकारणेत येउन वसुल केला जाईल. तसेच वारंवार असे घडल्यास त्या आस्थापनेचा / संस्थेचा परवाना कोविड -१९ ची अधिसुचना लागु असेपर्यंत रद्द करणेत येइल.
f. रेस्टॉरंट्स, हॉटेल मध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी भारत सरकारचे मार्गदर्शक सुचने प्रमाणे लवकरात लवकर कोविड १९ लसीकरण करुन घ्यावे जेणेकरुन कोविड १९ च्या प्रसाराची कोणतीही भीती न बाळगता सर्व पुन्हा सुरू करणे शक्य होईल.
● ९. धार्मिक स्थळे/ प्रार्थना स्थळे
a. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद राहतील.
b. धार्मिक स्थळांच्या सेवेत गुंतलेले सर्व कर्मचारी आपले कर्तव्य बजावत राहतील परंतु बाह्य अभ्यागतांना परवानगी नसेल.
c. धार्मिक स्थळी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी भारत सरकारचे मार्गदर्शक सुचने प्रमाणे लवकरात लवकर कोविड १९ लसीकरण करुन घ्यावे जेणेकरुन कोविड १९ च्या प्रसाराची कोणतीही भीती न बाळगता सर्व पुन्हा सुरू करणे शक्य होईल.
● १०. केशकर्तनालये / स्पा/ सलून/ ब्युटी पार्लर
a. केशकर्तनालये / स्पा/ सलून / ब्युटी पार्लर बंद राहतील.
b. उपरोक्त ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी भारत सरकारचे मार्गदर्शक सुचने प्रमाणे लवकरात लवकर कोविड १९ लसीकरण करुन घ्यावे जेणेकरुन कोविड १९ च्या प्रसाराची कोणतीही भीती न बाळगता सर्व पुन्हा सुरू करणे शक्य होईल.
● ११. वृत्तपत्रे
a. वर्तमानपत्रे मुद्रित आणि प्रसारित करणेस परवानगी असेल.
b. सर्व दिवशी सकाळी ०७:०० ते संध्याकाळी ०६:०० वाजे पर्यंत वृत्तपत्र वितरण करण्याची परवानगी असेल.
c. वरील उपक्रमात गुंतलेल्या सर्व व्यक्तीनी भारत सरकारचे मार्गदर्शक सुचने प्रमाणे लवकरात लवकर कोविड १९ लसीकरण करुन घ्यावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. वृत्तपत्र घरोधरी वितरण करणाऱ्या ज्या व्यक्तींचे लसीकरण झालेले नाही, त्यांचेकडे १५ दिवसांसाठी ग्राह्य असलेले नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील. सदरचा नियम दिनांक १० एप्रिल २०२१ पासुन लागु राहील.
१२. शाळा व महाविद्यालये
a. सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील.
b. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या मर्यादित नियम शिथिल केले जातील.
c. परीक्षांच्या संचालनासाठी वापरल्या जाणार्या सर्व कर्मचार्यांचे कोविड १९ लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे किंवा त्यांच्येकड़े मागील ४८ तासांचे आतील नकारात्मक आरटीपीसीआर अहवाल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
d. राज्याबाहेरील कोणत्याही मंडळ, विद्यापीठ किंवा प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत संबंधित संस्थांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समन्वयाने विद्यार्थांना पासेस परवानगी/पत्र/हॉलतिकिट वर दिलेली संमती इ. देण्याची कार्यवाही करावी.
c. सर्व प्रकारचे खाजगी कोचींग क्लासेस / शिकवण्या बंद राहतील.
f. वरील उपक्रमात काम करणा-या सेवा देणा-या सर्व व्यक्तींनी भारत सरकारचे मार्गदर्शक सचने प्रमाणे लवकरात लवकर कोविड १९ लसीकरण करुन घ्यावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.