पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील अक्षय क्लासिक आणि कुंदन इस्टेट या सोसायटीमध्ये नवीन सौर पॅनल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या नूतन सौर पॅनल यंत्रनेचे उद्घाटन माजी नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, जळणारी इंधन संपणारी असून प्रदूषण वाढवतात, त्याऐवजी सौर ऊर्जा ही टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही पर्याय आहे. त्यामुळेच भविष्यात सौर ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावेल. सौर ऊर्जा निर्माण करताना प्रदूषण होत नाही, धूर किंवा ग्रीन हाऊस गॅसेस निर्माण होत नाहीत, त्यामुळे हवामान बदल रोखण्यासाठी ती मदत करते. सौर ऊर्जा प्रणालीमुळे आपण वीज तयार करू शकतो आणि वीज वितरण कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. यामुळे आर्थिक बचतही होण्यास मदत होते.
सौर ऊर्जा हा अक्षय, स्वच्छ आणि पर्यावरणासाठी चांगला ऊर्जा स्रोत आहे. आपल्या रोजच्या जीवनात विविध पद्धतींनी आपण सौर ऊर्जा वापरू शकतो. शासनाकडून सबसिडी आणि प्रोत्साहनपर योजना सुरु करण्यात आले आहेत यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सोपे कर्ज, जागरुकता मोहिमा आणि शिक्षण, नवन तंत्रज्ञान विकसित करणे आदी जळणारी इंधने संपणारी असून प्रदूषण वाढवतात, त्याऐवजी सौर ऊर्जा ही टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही पर्याय आहे. त्यामुळेच भविष्यात सौरऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावेल.
याप्रसंगी शत्रुघ्न काटे यांनी हे सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल दोन्ही सोसायटीच्या चेअरमन आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी सोसायटी पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.