भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिं
विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदार संघातून आमदार महेश लांडगे यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. ‘विजयाची हॅट्रिक’ केल्याने लांडगे यांच्या मंत्रीपदाची चर्चा आहे. तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत मंत्रीपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे आमदार लांडगे यांच्या माध्यमातून शहराला पहिले कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यासह प्रभाग क्रमांक ७ मधील मतदारांनी आमदार महेश लांडगे यांना मतदानामध्ये आघाडी मिळवून दिली. त्याद्दलही पठारे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. यापूर्वी, निवडणूक निकाल लागण्याअगोदरच आमदार लांडगे समर्थकांनी विजयाचे फ्लेक्स लावले होते.
दरम्यान, येत्या १६ डिसेंबरपासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे. त्यापूर्वी १५ डिसेंबरला संध्याकाळी ४ वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यासोबतच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजप २१, शिवसेना १३ तर राष्ट्रवादी ०९ मंत्री शपथ घेतील अशी माहिती समोर येत आहे.