पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व कुणाल थोपटे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र राज्याचे युवानेते पार्थ अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
कुणाल थोपटे हे माजी नगरसेवक कैलास थोपटे यांचे सुपुत्र आहेत. आपल्या वडिलांप्रमाणेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांना आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी अभिनंदन केले.