आळंदी (Pclive7.com):- देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिराला फुलांनी ‘तिरंगा’मध्ये आकर्षक सजावट केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. अशातच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी मंदिरात धार्मिक परंपरेचे जतन करत विविध उत्सव परंपरेनुसार साजरे केले जातात.
याच धर्तीवर आज देशाच्या स्वातंत्र दिनानिमित्त देशी विदेशी फुलांनी तिरंगा साकारण्यात आला आहे.
स्वातंत्र दिनानिमित्त पहाटे दुग्धाभिषेक झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी माऊलींचा गाभारा ‘तिरंगा’मध्ये सजविण्यात आला आहे. फुलाच्या या आकर्षक सजावटीमुळे माऊलींचे आजचे रुप मन प्रसन्न करणारे पहायला मिळत आहे.