पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात कोविड १९ लसीकरणाचा १५ लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी याबाबतची माहिती प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड १९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत दि. १६ जानेवारी २०२१ पासून वय वर्ष १८ पुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आजपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांना कोविड १९ लसीकरण करण्यात आलेले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ६९ व १३२ खाजगी लसीकरण केंद्रांवर दि.१६ जानेवारी पासून आजपर्यंत १५,०७,२३७ (पंधरा लाख सात हजार दोनशे सदतीस) नागरीकांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवा देणारे HCW, फ्रंन्ट लाईन वर्कर (Front Line Worker), वय वर्षे १८ ते ४४, वय वर्षे ४५ ते ६०, वय वर्षे ६० वरील अशा गटवारीत लसीकरण देण्यात आले.