पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सदिच्छा भेट दिली.
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रहाटणी येथे रविवारी (दि.१७) राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा संपन्न झाला. त्यापूर्वी शरद पवार यांनी पिंपळे सौदागर येथील नाना काटे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील उपस्थित होते.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका शितल काटे, माजी नगरसेवक शंकर काटे, उद्योजक नंदकुमार काटे यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. काटे कुटुंबाने पवार साहेबांना श्री तिरूपती बालाजीची मुर्ती भेट देऊन सन्मानित केले. याप्रसंगी पिंपळे सौदागर भागातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
शरद पवार साहेबांचे पाय घराच्या उंबऱ्याला लागावेत हे प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याचे स्वप्न असते. साहेबांच्या भेटीमुळे खूप आनंद झाला आहे. काम करण्याची प्रचंड उर्जा मिळाली आहे. या उर्जेमुळे आगामी महापालिका निवडणुकीत चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडूण आणू असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला.