पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज कमान येथील रस्त्याच्या सुशोभिकरणाचे काम झाले आहे. या कामाअंतर्गत बाल ब्रह्मचारी सिदाजी आप्पा चौकात नवीन गाय वासरूचे शिल्पाचे अनावरण आज (दि.३१) शिवसेना संपर्कप्रमुख सचिन आहिर यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याचे सुशोभिकरण आणि या नवीन शिल्पासाठी शिवसेना नगरसेविका सौ. मिनल विशाल यादव यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
या प्रसंगी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका मिनल यादव, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, शिवसेना संघटक विशाल यादव, रवी नामदे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शिवसेना नगरसेविका, स्थायी समिती सदस्य मिनल यादव आणि शिवसेना संघटक विशाल यादव यांच्या संकल्पनेतून मोहननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज कमान – मेहता हॉस्पिटल येथे रस्त्याच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
या कामाअंतर्गत बाल ब्रह्मचारी सिदाजी आप्पा चौकामध्ये जुने गाय-वासरूचे शिल्प हटवून त्या ठिकाणी नवीन गिर गायचे गाय वासरू शिल्प बसविण्यात आले आहे. दिवाळीत वसुबारस सणाच्या आधी हे शिल्प बसविण्यात येईल असे आश्वासन नगरसेविका मिनल यादव यांनी दिले होते. त्यानुसार आज या नवीन शिल्पाचे अनावरण शिवसेना संपर्कप्रमुख सचिन आहिर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
मोहननगर येथील या गाय वासरूच्या शिल्पामुळे लिंगायत, गवळी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच सर्वच स्तरातून या नवीन शिल्पाचे स्वागत होत आहे.