पिंपरी (Pclive7.com):- देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधीत राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक कामकाज करण्याची शपथ आज महानगरपालिकेत घेण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान,भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, आयुक्त राजेश पाटील, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापूरे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, माहिती व जनसंपर्क विभागाचे विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
देशाच्या माजी पंतप्रधान,भारतरत्न इंदिरा गांधी यांचा जन्मदिन १९ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने पदाधिकारी आणि अधिकारी, कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
आम्ही हिंसाचाराचा कधीही अवलंब करणार नाही.धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे तसेच राजकीय व आर्थिक गा-हाणी ही शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवू अशी सामुहिक शपथ सर्वांनी यावेळी घेतली. प्रफुल्ल पुराणिक यांनी राष्ट्रीय एकात्मता शपथेचे वाचन केले.























Join Our Whatsapp Group