पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या विविध पदांसाठी इच्छुकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
त्या अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे या गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) पिंपरी चिंचवड दौ-यावर येणार आहेत. यावेळी सव्वालाखे या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत.
तरी शहर महिला अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणा-यांनी गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) सावित्रीबाई फुले स्मारक (हॉल), महात्मा फुले पुतळ्या मागे, गांधीनगर जवळ, पिंपरी येथे सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले आहे.


























Join Our Whatsapp Group