पिंपरी (Pclive7.com):- महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. जानेवारी २०२२ च्या दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्यात येणार आहे. सांगवीतील पी.डब्ल्यू.डी, पिंपरीतील एच.ए.ग्राऊंड आणि भोसरीतील गावजत्रा या तीन मैदानाचे पर्याय सुचविण्यात आले आहेत. याबाबतच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिली.
पुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे १५ वर्षांपूर्वीपासून पवनाथडी जत्रा भरविण्यास सुरुवात केली. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे मागील दोन वर्षे जत्रा भरविण्यात आली नव्हती.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा जत्रा भरविण्यात येणार आहे. जानेवारी २०२२ च्या दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्यात येणार आहे. सांगवीतील पी.डब्ल्यू.डी, पिंपरीतील एच.ए.ग्राऊंड आणि भोसरीतील गावजत्रा या तीन मैदानाचे पर्याय सुचविण्यात आले आहेत. जत्रेच्या ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

























Join Our Whatsapp Group