पिंपरी (Pclive7.com):- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने पिंपरीतील महात्मा ज्योतिबा फुले स्मारक येथील पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण क्षेत्राचा पाया रचला आणि आज घराघरात सावित्री तयार झाली. या सावित्रीचा आदर्श समाजातील स्त्रीयांच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी केला पाहिजे. संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष मोहन वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडीचे अध्यक्ष विशाल कसबे, मारूंजी गावचे सरपंच संदिप जाधव, संघटनेचे शहर उपाध्यक्ष सचिन दुबळे, नवनाथ शेलार, दिपक लोखंडे, विठ्ठल कळसे, अविनाश लांडगे आदी उपस्थित होते.