नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या हस्ते प्रकाशन
पिंपरी (Pclive7.com):- महाड – पोलादपूर तालुका समाजसेवा संघ, पिंपरी चिंचवड यांच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘ग’ प्रभागचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी संघाचे मुख्य प्रवर्तक सुभाष पवार, रमेश साळुंके, संघाचे अध्यक्ष अविनाश उत्तेकर, सचिव दिनकर जाधव, निलेश मोरे, रवींद्र चव्हाण, नंदू जाधव, सुरेश कदम, संतोष चिकणे, सुनील पालकर यांच्यासह संघाचे सर्व सभासद उपस्थित होते.
महाड – पोलादपूर समाजसेवा संघाची स्थापना १९९६ साली झाली. या संघामध्ये सुमारे १५००० सभासद असून सन २००० मध्ये संघाची स्वतंत्र पतसंस्था स्थापन करण्यात आली.
पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रात संघाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सातत्याने केले जाते. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी संघाच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
























Join Our Whatsapp Group