पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शहरात आज दिवसभरात तब्बल ५९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ओमायक्रॉनचे ६ रूग्ण आढळून आले आहेत. सातत्याने वाढणारा कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. दरम्यान आज दिवसभरात २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आज दिवसभरात ५९० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या दररोजच्या मोठ्या रुग्ण वाढीमुळे आज शहरातील सक्रिय रुग्ण संख्या १३६८ इतकी झाली आहे. यातील २६३ रूग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ११०५ रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज शहरात एकाही मृत्यूची नोंद नाही.
👉🏼 कोरोना अपडेट 👈🏻
बुधवार, ०५ जानेवारी २०२२
पिंपरी चिंचवड महापालिका
Pclive7.com च्या सौजन्याने
➡️ आजची रूग्णसंख्या = ५९०
➡️ ओमीक्रॉनचे आज बाधित = ०६
➡️ आजपर्यंत एकूण बाधित = २८०५१२
➡️ आज मयत = ००
➡️ आजपर्यंत एकूण मयत = ४५२६
➡️ सध्या सक्रिय रूग्णसंख्या = १३६८
➡️ आज डिस्चार्ज = २७