चिंचवड (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जतमध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही वेळ मतदान केंद्र बंद होते. त्यामुळे कर्जतमध्ये फेरमतदान घ्यावे. अन्यथा वेळ वाढवून देण्याची मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वादळी वारा व पाऊस पडल्यामुळे या भागातील विजेचे खांब पडले. घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर लाईट नसल्या कारणाने दोन ते तीन तास अनेक नागरिक मतदान करु शकले नाहीत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीची चौकशी करुन त्या भागात फेर मतदान घेण्याची मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.