मावळ (Pclive7.com):- शिवसेेनेच्या बंडखोर आमदारांच्या भूमिकेमुळे काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. स्वपक्षीय आमदार फुटल्यामूळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

बंडखोर आमदारांचा निषेध म्हणून मावळ शिवसेनेच्या वतीने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सकाळी ६ वाजता टायर जाळून रस्ता अडविण्यात आला. शिवसेना मावळच्या वतीने सोमटणे फाटा येथे शिवसैनिकांनी टायर जाळत रास्ता रोखत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर काहीकाळ महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
























Join Our Whatsapp Group