पुणे (Pclive7.com):- सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज आगमन झाले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात गणेशाचं स्वागत केलं जात आहे. बाप्पाच्या आगमनानं सगळीकडे आज उत्साहाचे वातावरण आहे. सार्वजिक गणेशोत्सवांच्या गणपतींचे आगमन देखील झाले आहे. गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील लोक पुण्यात दरवर्षी येत असतात. ढोल ताशाच्या गजरात गणपतीचं स्वागत केलं जातं. आशातच पुण्यातमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. रस्त्यावरील गर्दीमधून मार्ग काढत आज गणेश भक्त बाप्पाचं दर्शन घेत आहेत. अशातच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतलं. त्यानंतर भाऊ रंगारी गणपतीच्या प्रतिष्ठापणेसाठी ते जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता त्यांना वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मोटरसायकलवर बसून प्रवास केला. चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मोटरसायकलवर मागे बसून पुण्यातील गणपतींचं दर्शन घेणं पसंत केलं. तसेच चंद्रकांत पाटील हे भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या रथामध्ये देखील बसले होते.
यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. मात्र, यावर्षी सर्व नियम आणि निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात येणार असल्यानं गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय.