आळंदी (Pclive7.com) – प्रसाद बोराटे :- पिंपरी-राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या युवक आघाडीच्या खेड तालुकाध्यक्ष पदी आळंदी येथील हराळे समाज धर्मशाळेचे मा.विश्वस्त तुकाराम नेटके यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वरजी कांबळे साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

संघटनेची बैठक पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यालय येथे नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुदाम कांबळे, प्रदेश संघटक सचिव प्रा.दत्तात्रय शिंदे, प्रदेश सचिव सत्यवान भोईटे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हादभाऊ कांबळे, हराळे समाज धर्मशाळेचे सचिव अतुल कानडे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कांबळे, आळंदी शहराध्यक्ष बाळू नेटके तसेच तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजीमंत्री बबनराव घोलप व आमदार योगेश घोलप यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली तालुक्यात चर्मकार समाजाच्या युवकांना महासंघाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी तुकाराम नेटके यांनी सांगितले.
























Join Our Whatsapp Group