पिंपरी (प्रतिनिधी):- वरिष्ठ विमा सल्लागार तात्यासाहेब शेवाळे यांच्या पुढाकाराने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या विमाधारकांच्या मेळाव्यास उदंड प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी माजी महापौर योगेश बहल, एलआयसीचे विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक प्रशांत नायक, बांधकाम व्यावसायिक अनिल फरांदे, राष्ट्रीयस्तरीय व्यावसायिक प्रशिक्षक संतोष नायर, राजेंद्र जैन, सतीश अगरवाल, दिनेश गुंठे, दामोदर मोरे, वास्तुविशारद राजेंद्र कोरे, उद्योजक ओमप्रकाश पेठे, सुभाष जयसिंघानिया,अशोक बिराजदार अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षक नायर यांनी ‘द पॉवर ऑफ़ रिएलायजेशन’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी नायक म्हणाले कि, तात्या शेवाळे यांनी विमा क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे. शेवाळे यांनी विम्याच्या माध्यमातून अमेरिकेत व्याख्यान दिले. विमा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देशभरात ते एलआयसीचे ब्रँड बनले आहे.देश परदेशात त्यांनी नावलौकिक कमवाला आहे.त्यांच्या कार्याबद्दल एलआयसीने एक मर्सिडिज बेंज कार देवून सन्मानित केले आहे.
तात्या शेवाळे म्हणाले कि, सुरुवातीला नागरिकांच्या मनात विम्या बाबतीत नकारात्मक दृष्टीकोण होता.मात्र आज विम्याचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे. विमा हि काळाची गरज बनली आहे. तरूण पिढीला करियरसाठी विमा क्षेत्र हे खुणावत आहे.
या मेळाव्याला सर्व क्षेत्रातील सुमारे बाराशे जण सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय शेवाळे व नेहा कोळी यांनी केले तर आभार राजेंद्र कोळी यांनी मानले.