पिंपरी (Pclive7.com):- भारतीय निवडणुक आयोग यांचेकडून प्राप्त झालेल्या दि. ३१/१०/२०२३ च्या निर्देशानुसार, ३३ मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत, २०५, चिंचवड विधानसभामध्ये ८५+ वर्षावरील जेष्ठ मतदार व ४० % पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदार यांचेकरीता गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. बीएलओ मार्फत मतदार संघातील ८५+ व दिव्यांग मतदार यांच्या घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यात आलेले होते.
त्यापैंकी ८५+ वय असलेले ५२ मतदार व दिव्यांग असलेले २ मतदार यांनी विहीत नमुन्यात अर्जाव्दारे गृह मतदानाची मागणी केली होती. व त्यांना गृह मतदानाकरीता पात्र करण्यात आलेले होते. सदर मतदारांचे गृह मतदान आज दि. ०८/०५/२०२४ रोजी घेणेत आले. याकरिता एकुण ६ पथकांची नेमणुक करणेत आली होती. त्यांचे मार्फत गृह मतदानाची प्रक्रिया संपन्न करण्यात आली. आज ५४ पैंकी ५१ मतदारांनी आपला हक्क गृह मतदानाव्दारे बजावला. इतर २ मतदार प्रकृत्ती अस्वस्थामुळे मतदान करु शकलेले नाहीत, तर १ मतदाराचा मृत्यु झालेचे आढळले.
सदर प्रक्रिया ३३ मावळ लोकसभा निवडणुक निर्णय अधिकारी दिपक सिंघला व २०५ चिंचवड विधानसभाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांचे मार्गदर्शनाखाली टपाली मतदानाचे चिंचवड नोडल अधिकारी अमित पंडित व त्यांचे सहकारी यांनी पार पाडली. सदर प्रक्रिया मा. निवडणुक आयोग यांचे सुचनेप्रमाणे पोलीस बंदोबस्तात व संपुर्ण व्हिडीओग्राफी सहीत काटेकोरपणे पार पाडण्यात आली.