पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत लोकनियुक्त सदस्य यांचा कार्यकाळ संपल्यावर राज्य शासनाने १३ मार्च २०२२ रोजी प्रशासकाची नेमणूक केली होती. प्रशासकीय कारभार महापालिकेत सुरू असून ६ ते ७ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या कालावधीतील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उद्या (शुक्रवार दि.२३) रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली.

या बैठकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महापालिकेमार्फत सुरू असलेल्या सार्वजनिक विकास कामांची आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेच्या विविध विभागातील अर्थात स्थापत्य, बीआरटीएस, उद्यान, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय, पाणीपुरवठा, पर्यावरण, नगररचना, प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, विद्युत, कर संकलन, एलबीटी, बांधकाम परवानगी, आकाश चिन्ह,लेखा व लेखापरीक्षण विभाग, समाज विकास, भांडार विभाग, नागरी सुविधा केंद्र, सुरक्षा, वाहतूक यासह महापालिकेच्या अधिनस्त विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा या बैठकीत घेणार असल्याचे आमदार बनसोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group