पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांची निवासस्थानी जाऊन (दि.३०) सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार जगताप यांचे बंधू भाजपा नेते शंकर जगताप व विजयशेठ जगताप यांनी पुष्पगुच्छ आणि देवीची प्रतिमा देऊन नितीन गडकरी यांचा सत्कार केला.
त्याप्रसंगी माजी महापौर सौ.माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्राधिकरण नवनगर विकासचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, उपाध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड शेखर चिंचवडे, माजी नगरसेविका सौ.उषाताई मुंढे, सौ.निर्मलाताई कुटे, सौ.माधवीताई राजापुरे, माजी नगरसेवक श्री.सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते श्री.हरिभाऊ चिंचवडे, श्री.राज तापकीर व इतर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नितीन गडकरी यांचा काल पुणे दौरा होता. पुण्यातील एन.डी.ए. चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे मनपा हद्दीतील वाहतूक कोंडी होत असलेल्या भागातील समस्यांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा केली.