मुंबई (Pclive7.com):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या धमकीनंतर शिंदेंच्या ठाण्यातील आणि शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बीकेसीवर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याआधी मिळालेल्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
























Join Our Whatsapp Group