पिंपरी (Pclive7.com):- सम्राट अशोकाचे पाईक स्मृतीशेष डॉ. अशोक शिलवंत यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त उद्या रविवार दि.०९ ऑक्टोबर २०२२ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी दिली आहे.
उद्या रविवार दि.०९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी पुणे येथे अभिवादन सभा, पुरस्कार वितरण तसेच आरोग्य शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये रक्त तपासणी, ECG, नेत्र चिकीत्सा, मधुमेह तपासणी, दंत चिकीत्सा, त्वचा रोग तपासणी स्त्रीरोग चिकीत्सा, हृदयरोग तपासणी मोफत होणार आहे. तरी जास्तीजास्त संख्येने नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केले आहे.