पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील नाशिक फाट्याजवळ खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. सुदैवाने ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. सकाळी सातच्या सुमारास बसला ही आग लागली. शॉर्टसर्किट होऊन ट्रॅव्हल्सला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. वल्लभनगर येथील अग्निशमन दलाने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडी येथून भोसरीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. सुदैवाने यात प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. ट्रॅव्हल्स मध्ये दोन चालक होते. त्यापैकी, एक जण ट्रॅव्हलमध्ये झोपला होता. बसला आग लागल्यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवत त्याला बाहेर काढले.
याबाबतची माहिती वल्लभनगर येथील अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमनच्या दोन वाहनांनी तातडीने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत ट्रॅव्हलच्या पुढील भाग जळून खाक झाला होता. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.
भूषण येवले (फायरमन), विशाल फडतरे (डी.सी.ओ), रुपेश जाधव (डी.सी.ओ), मयूर कुंभार (डी.सी.ओ), सिध्देश दरवेस (ट्रे.फायरमन), प्रतिकअहिरेकर, समीर पोटे, प्रतिक खांडगे, शुभम क्षीरसागर, अनिकेत गोडसे, संकेत भोसले, अक्षय झुरे या अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.