पिंपरी (Pclive7.com):- मैत्री महिला व्यासपीठ आणि राजमुद्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वरपहाट सप्तसूर’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २७ येथील गजानन महाराज मंदिरात सोमवार दि. २४ ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजता हा कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरपहाट सप्तसूर’ या कार्यक्रमात आनंदी जोशी, मंगेश बोरगावकर, जुईली जोगळेकर, पद्मनाभ गायकवाड आणि अंजली गायकवाड हे गायक व स्वानंदी टिकेकर आणि यशोमन आपटे हे कलाकार सहभागी होणार असून निवेदन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करणार आहे. हे दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे १८ वे वर्ष आहे.
तसेच बुधवार दि. २६ ऑक्टोबर रोजी प्राधिकरणातील गणेश तलाव येथे सायंकाळी सहा वाजता भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा सर्व नागरिकांनी आनंद घ्यावा असे संयोजक राजू मिसाळ यांनी यानिमित्ताने आवाहन केले आहे.
Tags: Diwali PahatncpPradhikaranRaju MisalSaptasurप्राधिकरणमाजी विरोधी पक्षनेतेमैत्री महिला व्यासपीठराजमुद्रा ग्रुपराजू मिसाळस्वरपहाट सप्तसूर
























Join Our Whatsapp Group