पिंपरी (Pclive7.com):- जीतो पिंपरी-चिंचवड चॅप्टरच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा काळेवाडी येथे संपन्न झाला. यावेळी जीतो पिंपरी चिंचवड चॅप्टरचे अध्यक्ष मनीष ओसवाल, मुख्य सचिव योगेश बाफना त्यांच्यासह ४७ पदाधिकाऱ्यांनी पदाची शपथ घेतली. नियुक्त केलेल्या कार्यकारिणीचा कार्यकाल २०२२-२४ या दोन वर्षासाठी असेल.
यावेळी जीतो ॲपेक्सचे माजी अध्यक्ष व श्रमण आरोग्यचे उपाध्यक्ष विजय भंडारी यांनी पदाची शपथ दिली. जीतो ॲपेक्सचे उपाध्यक्ष कांतीलाल ओसवाल, आरओएम झोनचे माजी खजिनदार राजेंद्र जैन, जेएलडब्ल्यू -जीतो अॅपेक्सच्या प्रकल्प निमंत्रक तृप्ती कर्णावट, जीतो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश साकला, पिंपरी चिंचवड चॅप्टरचे माजी अध्यक्ष संतोष धोका, जितो पुणे व चिंचवड पिंपरी परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड चॅप्टरचे नवीन पदाधिकारी पुढीलप्रमाणे मनीष ओसवाल, (अध्यक्ष),- दिलीप सोनिगरा, प्रकाश गदिया आणि राजेंद्र मुथा (तिघे उपाध्यक्ष) योगेश बाफना (सरचिटणीस), संजय जैन (सचिव), प्रितेश रांका (सहसचिव), संतोष संचेती (खजिनदार) – नवनीत बोरा (सह कोषाध्यक्ष) जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत शपथ घेतली.
वैशाली बाफना (अध्यक्ष), हर्षा लोडिया (सचिव) कीर्ती जैन (सह सचिव), अर्चना चोरडिया आणि पूनम बंब (दोघी उपाध्यक्षा), डॉ योगिता लुंकड (मुख्य सचिव), सारिका सोलंकी (खजिनदार) युथ विंगचे विशाल सोनिगरा (अधक्ष), रोहन जैन (सरचिटणीस) संकेत जैन (खजिनदार) आदी उपस्थित होते. यावेळी जीतोचा सेवा, शिक्षण आणि व्यापार हा हेतू साध्य करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष ओसवाल यांनी यावेळी दिली.