पिंपरी (प्रतिनिधी):- राज्यातील लोडशेडिंगच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील महावितरणाच्या कार्यालयावर ‘कंदील’ मोर्चा काढण्यात आला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आणि युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यासह राज्यभरात लोडशेडिंग सुरु आहे. लोडशेडिंगमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. लोडशेडिंगवरुन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. विरोधी पक्षात असताना लोडशेडिंग आणि महागड्या विजेचे गौडबंगाल काय, कोळश्यात घोटाळा करायचा आहे, असे बिनबुडाचे आरोप करत भाजपने सत्ता काबीज केली. आता राज्यात लोडशेडिंग आहे, याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची उत्तरे द्यावीत. लोडशेडिंग कशासाठी, कोणासाठी याचा खुलासा करावा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी संजोग वाघेरे म्हणाले की, सरकारने जर नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर, राष्ट्रवादीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. तसेच यावेळी विशाल वाकडकर यांनी देखील तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर महावितरणचे अधिकारी खळदकर यांना कंदील व कोळसा भेट देऊन लोडशेडींग रद्द करण्याबाबत निवेदन पत्र देण्यात आले.
या आंदोलनात नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, नगरसेविका संगीता ताम्हणे, अपर्णा डोके, पक्ष प्रवक्ते फजल शेख, माजी नगरसेवक मछिंद्र तापकिर, आंनदा यादव, कविता खराडे, गंगा धेंडे, विजया काटे, विश्रांती पाडाळे, मिनाक्षी उंबरकर, वर्षा शेडगे, प्रदीप गायकवड, अभिषेक बोके, उत्तम आल्हाट, फिरोज शेख, यतीन पारेख, धैर्यशील धर्मे, महेश झपके, संदीप पाटील, विशाल काळभोर, विनोद कांबळे, ऋषिकेश वाघेरे-पाटील, रवींद्र वाकडकर,