तळेगाव दाभाडे (Pclive7.com):- बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमवारी (दि. २०) पहाटे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याजवळ ही कारवाई केली.
सचिन किसन शिंदे (३८, रा. लोणीकंद, ता. हवेली), गौरव कमलाकर शिंदे (२०, रा. लोणीकंद, ता. हवेली), अजिंक्य दादासाहाबे म्हस्कुटे (२५, रा. खामगाव, ता. दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे मुंबई महामार्गाने एक चारचाकी वाहन पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात आहे. चारचाकीमधील लोकांकडे पिस्तूल असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार तळेगाव पोलिसांनी घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला सापळा लावून वाहन अडवले. वाहनामधील तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता पोलिसांना एक पिस्तूल आणि चार काडतुसे आढळली. याबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तिन्ही संशयित पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सचिन शिंदे याच्या विरोधात २०१२ मध्ये लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तसेच २०२१ मध्ये लोणीकंद पोलिस ठाण्यात सचिन आणि गौरव शिंदे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर २०२२ मध्ये चिखली पोलिस ठाण्यात गौरव शिंदे आणि अजिंक्य म्हस्कुटे यांच्या विरोधात शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त देवीदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण रायन्नवार, उपनिरीक्षक विलास गोसावी, सहायक फौजदार दिलीप कदम, पोलिस अंमलदार किशोर गिरीगोरावी, प्रकाश जाधव, प्रीतम सानप, हर्षद कदम यांच्या पथकाने केली.
























Join Our Whatsapp Group