पिंपरी (Pclive7.com):- जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनसेवा विकास समितीचे आनंद रामचंद्र बनसोडे यांच्या माध्यमातून दापोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण आश्रमास लहान मुलांना स्नेहभोजनाचा व ब्लॅंकेट वाटपाचे कार्यक्रम राबविण्यात आला. स्वतः किशोरभाऊ आवारे व आनंद रामचंद्र बनसोडे यांच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
तसेच थेरगाव येथील इम्मानुएल अनाथालयात भोजनाचा आनंद मुलांसोबत घेतला. अशा प्रकारे किशोरभाऊंनी मायेची पाखर मुलांना देत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.