पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात गोवरचे पाच रूग्ण आढळून आले आहेत. या आजाराची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या रहिवास क्षेत्रासह शहरभरात महापालिकेने सर्व्हेक्षण सुरु केले आहे. गोवरबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

आकुर्डी रुग्णालय अंतर्गत चिखली कुदळवाडी भागात गोवर आजाराचे ८ संशयित रूग्ण आढळून आले. या रुग्णांची रक्ततपासणी व घशातील द्रावाची तपासणी मुंबईत हाफकिन येथील प्रयोगशाळेत करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यातील इतर शहरातील आजाराचा उद्रेक लक्षात घेता गोवर संपूर्ण शहरात सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. याअंतर्गत पाच वर्षाखालील २३, ८३४ बालकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. प्रामुख्याने पाच वर्षाखालील बालकांमध्ये हा आजार आढळत असल्याने कुटुंबीयांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे. मुलांना गोवरची लक्षणे असल्यास शाळेत आणि इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणं दिसल्यास घाबरुन जाऊ नये. बालकास तातडीने नजिकच्या रूग्णालयात न्यावे. घरी उपचार करू नये किंवा अंगावर काढू नये, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.
























Join Our Whatsapp Group