पिंपरी (Pclive7.com):- महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्यास अभिवादन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात भाविक / अनुयायी येत असतात. त्यामुळे चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होवू नये, वाहतूक सुरळीत रहावी यासाठी पिंपरी चौकातील वाहतूक मंगळवारी (दि.६) रोजी दुपारनंतर तात्पुरत्या स्वरुपात अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतिश माने यांनी दिली आहे.

महाविर चौक चिंचवडकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्व्हिस रोडने येणारी वाहतुक बंद करून ती डी-मार्ट इन ग्रेड सेपरेटर मधुन इच्छित स्थळी जातील. नाशिक फाटयाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्व्हिस रोडने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एच.पी. पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इनमध्ये प्रवेश करुन इच्छित स्थळी जातील.
स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असुन ही वाहने स्व. इंदिरा गांधी पुलावरुन मोरवाडी चौकाकडे जावुन इच्छित स्थळी जातील. नेहरुनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असुन ही वाहने एच. ए. कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनी व तेथुन इच्छित स्थळी जातील.
























Join Our Whatsapp Group