पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी, काळेवाडी येथील निवृत्त शिक्षक बबन लक्ष्मण गाडे यांचे आज (दि.२३) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक आज का आनंदचे जेष्ठ पत्रकार विवेक गाडे यांचे ते वडील होत. बबन गाडे यांच्या पार्थिवावर आज रात्री ८ वाजता पिंपरी-चिंचवड लिंक रोड पत्राशेड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.