मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची माहिती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आज (दि.०८) होत असलेल्या दोन विविध कार्यक्रमांना राज ठाकरे तसेच शर्मिला राज ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे.

याबाबत सचिन चिखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९:३० वाजता दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी भेट देणार आहेत. त्यानंतर जागतिक मराठी अकादमी व डॉ. डि.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आयोजित ‘१८ वे जागतिक मराठी संमेलन’ या कार्यक्रमास ‘डॉ. डि.वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे’ या ठिकाणी सकाळी ११:०० वाजता मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.
तर त्यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे ह्या मनसे पदाधिकारी सौ.अनिता पांचाळ आयोजित ‘बक्षीस वितरण सोहळ्यास’ सायं:०६:०० वा. ‘ज्योतिबा उद्यान, बी.आर.टी.रोड, पवनानगर, काळेवाडी या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.
























Join Our Whatsapp Group