पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी इच्छुकांची मोठी गर्दी केली होती. आज दिवसभरात तब्बल २८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज एका उमेदवाराने तब्बल १० हजार रुपयांची चिल्लर रक्कम अर्ज शुल्क म्हणून आणली. ती मोजताना अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला.

आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत होती. या मुदतीमध्ये अर्ज भरण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये रयत विद्यार्थी परिषदेचे राजू काळे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. डिपॉझिट भरण्यासाठी त्यांनी तब्बल १० हजार रुपयांची चिल्लर आणली होती. एक बॅग भरून आणलेल्या या चिल्लरमध्ये एक, दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी होती. ही चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना सुमारे एक तास लागला.
चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने केलेल्या बंडखोरीमुळे रंगत आली असताना, या उमेदवाराने अर्ज दाखल करताना दिलेले १० हजार रूपयांची चिल्लर चांगलाच चर्चेचा विषय ठरली.
























Join Our Whatsapp Group