पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड परिसरातील नामवंत सुवर्णपेढी म्हणजेच सत्यम ज्वेलर्स यांनी नुकतेच ४०व्या वर्षात पदार्पण केले. ४० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात आमदार सौ.उमाताई खापरे, नगरसेविका श्रीमती सुमनताई पवळे, नगरसेविका सौ.शैलजाताई मोरे तसेच नगरसेविका सौ.शर्मिलाताई बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्यम ज्वेलर्स हे सोन्याच्या व्यवसायात आहेत, तर त्यांनी लवकरच त्यांच्या ‘सुवर्ण महोत्सवी वर्षात’ पदार्पण करावे आणि पुढेही ग्राहकांना अशीच उत्तम सेवा द्यावी अशी भावना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. आमच्या ४० वर्षांच्या यशाचे खरे शिल्पकार आमचे सन्माननीय ग्राहक आहेत. त्यांच्या शिवाय हे शक्य नव्हतं अशी मनमोकळी प्रतिक्रिया यावेळी सत्यम ज्वेलर्सचे संस्थापक श्री. किरणराज चोपडा यांनी बोलून दाखवली. त्यांनी यावेळी सत्यम ज्वेलर्सचे सर्व सेवक वर्गाचेही आभार मानले.
यंदाच्या लग्न समारंभासाठी सुवर्ण खरेदी करताना ग्राहकांचा विचार करून आम्ही एक आगळीवेगळी ऑफर सर्वासाठी देत आहोत. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर चक्क २५% सूट. हि सूट कॅश बॅक स्वरूपात असेल आणि हि योजना दि. १६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत सुरु असेल अशी माहिती श्री. महावीर चोपडा यांनी दिली.
सोन्याच्या भावात सतत होणारी वाढ, परंतु लग्नसराई असल्यामुळे सोन्याची खरेदी तर करावी लागणार आहे. अश्या महागाईच्या कात्रीत सापडलेल्या आमच्या सर्व ग्राहकांचा तब्बल २५% फायदा होईल आणि ४० वर्षे पूर्तीनिमित्त ही ग्राहकांना आमच्या कडून सप्रेम भेट आहे. आमच्या निगडी, कृष्णानगर व चाकण ह्या तिन्ही शाखांमध्ये हि ऑफर उपलब्ध आहे.
ह्या ऑफरद्वारे पारंपारिक चपलाहार, कोल्हापुरी साज, ठुशी अश्या मराठमोळ्या दागिन्यांच्या बरोबरीनेच आधुनिक दागिन्यांमधील छोटे मंगळसूत्र, नवजात मुला-मुलींचे दागिने ते वधू-वरांचा साखरपुडा किंवा लग्नापर्यंतच्या भरजरी अश्या विविध डिझाइन्समधील दागिने आपण मनसोक्त खरेदी करू शकता. एवढंच नाही तर भारताच्या विविध राज्यांमधली कलात्मकता लक्षात घेऊन पोलकी, जडाऊ, अँटिक, कुंदन, ह्या व अश्या अनेक दागिन्यांची कलाकृतीही आमच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे अशी माहिती श्री दीपक व राहुल चोपडा यांनी दिली.
Tags: Satyam jwellers