पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश मिळाले आहे. रहाटणी, पिंपळे सौदागर येथील कापसे लॉन्स ते द्वारका सनक्रिस्ट सोसायटी पर्यंतचा 12 मीटर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला मंजुरी मिळुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नाना काटे यांच्या उपस्थितीत या कामाला आज सुरुवात झाली आहे.
रहाटणी पिंपळे सौदागर मधील सगळेच रस्ते सिमेंट काँक्रेटचे झाले आहेत. परंतु कापसे लॉन्स ते द्वारका सनक्रिस्ट सोसायटी पर्यंतचा रस्ता अजूनही डांबरी स्वरूपाचा होता. गेली अनेक दिवसांपासून स्थानिक सोसायटीधारकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालीकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्याकडे मागणी करत आमचा रोड सुद्धा सिमेंट काँक्रीट मध्ये झाला पाहिजे अशी विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव रस्ता होऊ शकत न्हवता. नागरिकांच्या रास्त मागणीचा विचारात घेऊन नाना काटे यांनी महानगरपालिका स्थापत्य विभाग तसेच पालिका आयुक्त यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत व पालिका प्रशासन व मुळ जमीन मालक हिरामण कापसे यांच्यात योग्य समन्वय साधत, हिरामण कापसे यांना योग्य मोबदला मिळावा जेणेकरून रस्त्याचे रखडलेले काम लवकर चालु होईल अशी विनंती नाना काटे यांनी पालिका प्रशासनास केली. या सर्व विनंतीला व पाठपुराव्याला पालिका प्रशासन तसेच हिरामण कापसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आज अखेर रस्त्याचे काम सुरु झाले.
सदर रस्ता हा 12 मीटर असून या कामास 3 कोटी 9 लाख रुपये एवढा निधी मंजुर झाला आहे. प्रशस्त अश्या रस्त्याच्या एका बाजुला प्रशस्त फुटपाथ व दुसऱ्या बाजुला ऍटग्रेड तसेच दोन्ही बाजूस अत्याधुनिक एलईडी पथदिवे, नागरिकांसाठी उत्तम अशी बैठक व्यवस्था असे नियोजन असेल.
या उदघाटन प्रसंगी संबंधित रस्त्याचे ठेकेदार मे.पृथ्वी एन्टरप्रायझेसचे विजय पवार, इंजिनिअर दलित कांबळे, सोसायटी सभासद दीपक कोठावडे, अंकित सिंग, किशोर पाटील, सावन मेहता, हेमराज लांडे, धनंजय मागरूळकर, अमित मालपुरे, प्रशांत देशपांडे, रॉबिन कायस्थ, ज्ञानेश कवाडे, भूषण नेरकर, मयंक अवधिया, मुकुल कामत, अमन कामत तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक दिवसांपासून चालत आलेला रस्त्याचा प्रश्न सुटल्याबद्दल नागरिकांनी नाना काटे यांचे आभार मानले.