पिंपरी (Pclive7.com):- कोरोनापासून बचाव करण्यासाठी सिरिंजशिवाय आता नाकावाटे देखील लस घेता येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेला नाकावाटे देण्यात येणारी इन्कोव्हॅक लस उपलब्ध झाली आहे, महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये ही लस देण्यात येणार आहे.
सुरुवातीला लसीच्या साठ्यानुसार ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना गुरुवार (दि.४) ते शनिवार (दि.६) असे तीन दिवस लस देण्यात येईल. ज्यांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिने किंवा २६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अँप या पद्धतीने नाकावाटे ही लस देण्यात येणार आहे.
लस येथे उपलब्ध असणार..
आकुर्डी येथील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड, नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय भोसरी, यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय या ठिकाणी लस देण्यात येणार आहे.
यांना लस मिळणार..
६० वर्षे व पुढील नागरिकांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीच्या दुसया डोसनंतर ६ महिने किंवा २६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या दवाखान्यात लसीची सोय आहे.