पिंपरी (Pclive7.com):- आषाढी वारीचे औचित्य साधून लहान मुलांमध्ये देखील संस्कृती जतन व्हावी म्हणून कृष्णानगर मधील केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी वारीचा सोहळा आनंदात साजरा करण्यात आला. तसेच मुलांना पालखी घेऊन मिरवणूक देखील काढण्यात आली.

पालखी सोहळ्यामध्ये कृष्णानगर परिसरातील नागरिक तसेच सर्व मुलांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न केलेल्या सर्व पालकांचे व नागरिकांचे केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल स्कूल कृष्णानगर ब्रांच डायरेक्टर सौ. कीर्ती मारुती जाधव यांनी आभार व्यक्त केले.
Tags: आरती जाधवकृष्णानगरकेंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूलचिमुकल्यांनी साजरा केला आषाढी वारीचा सोहळा
























Join Our Whatsapp Group