पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये बुधवारी आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकरी दिंडी सोहळा शाळेत साजरा करण्यात आला. संस्थापक उपाध्यक्ष अनिता संदिप काटे, निहारा काटे, लीना काटे आणि उपस्थित प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या हस्ते विठू माऊली व पालखीची पूजा करण्यात आली.
याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. काही बालकलाकार विठ्ठल रुक्मीणी, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताई, संत जनाबाई यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.

शाळेच्या संगीत शिक्षिका आणि विद्यार्थी – विद्यार्थीनींनी अभंग सादर केले तसेच लेझिमचे बहारदार प्रात्यक्षिक सादर केले.
सौ. अनिताताई संदीप काटे यांनी याप्रसंगी उपस्थित पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फुगडया खेळून व रिंगण करून विठ्ठल नामाचा जयघोष केला. यावेळी पालकवर्गातर्फे नारायण दुबरिया, नरहरी उदगिरकर, के. के गुल्हाटी, गीता नायक, रेखा पाटील, मालखेडे, सूर्यवंशी, उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी तुळशी वृंदावन व ग्रंथ घेऊन विठुरायाच्या नामघोषात दिंडी सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया बोंडे आणि आभार नेहा मगर यांनी मानले.





















Join Our Whatsapp Group