पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या निगडी प्रभाग क्र.१३ च्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विष्णू बळीराम लोखंडे यांची आज निवड करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी विष्णू लोखंडे यांच्या निवडीची घोषणा करत निवडीचे पत्र दिले.
विष्णू लोखंडे हे निगडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या निवडीबद्दल शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी उद्योजक पक्षातील विवीध पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट देशाचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सरकारच्या चुकीच्या कामांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आवाज उठविणार आहे, असे विष्णू लोखंडे यांनी निवडीनंतर सांगितले.
























Join Our Whatsapp Group