पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूल कृष्णानगर ब्रांचमध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.

कृष्णानगर, फुलेनगर, घरकुल, शरदनगर, संभाजीनगर, मोरे वस्ती परिसरामधील चिमुकल्यांनी या नेत्र तपासणी शिबिरामध्ये हिरीहिरीने सहभाग घेतला. कृष्णानगर केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूलच्या डायरेक्टर सौ. कीर्ती मारुती जाधव यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिर सुरुवात करण्यात आली. तसेच वायसीएम मधील डॉक्टर स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्याकरता स्कूल मधील संपूर्ण स्टाफ व वायसीएमएच हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेंद्र वाबळे सर यांचे मोलाचे योगदान मिळाले.
तसेच मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने असेच वेगवेगळे उपक्रम प्रत्येक वर्षी येतील असे कीर्ती जाधव यांनी सांगितले व सर्वांचे आभार मानले.
Tags: Pcmc newsPimpri Chinchwadकीर्ती जाधवकृष्णानगरकेंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूलनेत्र तपासणी शिबिर





















Join Our Whatsapp Group