पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी तापकीरनगर येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वर्गात व शाळेच्या मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे उद्घाटन वाकड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस उपनिरीक्षक वीरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक अभिजित जाधव, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, सोमनाथ तापकीर, राजू पवार तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना वीरेंद्र चव्हाण म्हणाले की, सध्या विद्यार्थ्याची सुरक्षा फार महत्वाची झाली आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाने शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये व मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले ही चांगली बाब आहे. युवानेते सागर तापकीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.






















Join Our Whatsapp Group