पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील श्री संत ज्ञानेश्वर ब्राह्मण सभेतर्फे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगरसेविका शितल काटे, निर्मलाताई कुटे, स्वप्ना काटे, कुंदाताई भिसे, स्वाती काटे, सुप्रिया पाटील तसेच माजी नगरसेवक शत्रृघ्न काटे, संजय भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठ कलाकार शशिकांत कुलकर्णी यांनी सादर केलेल्या गणेश स्तवनाने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात ब्राह्मण सभेच्या महिला सदस्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वेन्सर हॉस्पिटलचे डॉ. भूषण शितोळे यांनी ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या गुडघेदुखी सर संदर्भात माहिती देऊन त्यावरील उपचाराबाबत मार्गदर्शन केले.
विलास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश भट यांनी केले. सुत्रसंचलन स्नेहा चिंचवडकर यांनी केले तर श्रीकृष्ण निलेगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल कुलकर्णी, श्रीनिवास पारखी, प्रदिप कुलकर्णी, शशांक खांडेकर आदिंनी परिश्रम घेतले.
























Join Our Whatsapp Group