जागतिक महिला दिनदिनानिमित डॉ. आदित्य पतकराव यूथ फाउंडेशन व मानव परिवर्तन विकास व बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आयोजन
पुणे (Pclive7.com):- डॉ. आदित्य पतकराव यूथ फाउंडेशन व मानव परिवर्तन विकास व बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे १० मार्चला राष्ट्रीय महिला संसद २०२४ भरवण्यात आली. यावेळी देशभरातील १३८ कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रीय उत्कृष्ट महिला पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या श्रीमती. रिंचेन लाम्हो, भारत सरकार तर्फे माँटेनेग्रो देशाच्या ऑनररी काउन्सुलेट डॉ. जाणीस दरबारी, भारत सरकारच्या अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या श्रीमती अनुज बाला, भारत सरकारच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीमती नसरीन, भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाचे सल्लागार सदस्य तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. आदित्य पतकराव, अभिनेत्री व मॉडल श्रीमती नुपूर मेहता यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कर सन्मानित महिलांचे व भारत भूषण पुरस्कार्थीचे अभिनंदन केले. तसेच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे शिस्तप्रिय आयोजन केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक डॉ. आदित्य युथ फाउंडेशनचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाची सांगता करताना डॉ. आदित्य पतकराव म्हणाले की, देशभरातील सर्व महिलांनी पुढे येऊन आपल्या देशासाठी असेच योगदान द्यावे व देशाच्या प्रगतीला हातभार लावावा. राष्ट्रीय महिला संसद २०२४ च्या कार्यक्रमा दरम्यान पुणे येथील अमोल टेंभरे व नामदेव तौर यांचा सामाजिक कार्यासाठी
भारत भूषण पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय महिला उत्कृष्ट पुरस्काराने महाराष्ट्रातील खालील महिलांचा सन्मान करण्यात आला.
१) श्रीमती. अनुजा साळवी- सामाजिक कार्य (मुंबई)
२) श्रीमती. सुलोचना नामदेव माळी – उत्कृष्ठ शासकीय नोकरी (सांगली)
३) श्रीमती. कविता भावलाल साळुंखे – उत्कृष्ठ महाराष्ट्र पोलीस (छत्रपती संभाजी नगर)
४) श्रीमती. जयश्री राधाकिसन शिंदे – सामाजिक कार्य (छत्रपती संभाजी नगर)
५.) डॉ. ज्योत्सना रामराव अड्डे – दंत क्षेत्रातील पेटंट होल्डर (अंबाजोगाई)
६) डॉ. भाग्यश्री कुलकर्णी – सामाजिक कार्य (धुळे)
७) श्रीमती अर्चना वैद्य – व्ही. जे. एन. टी सेल विशेष कार्य तसेच सामाजिक कार्य (पुणे)
तसेच विशेष पुरस्कार्थी म्हणून
१) श्रीमती कामाक्षी शर्मा – सायबर सेक्युरेटी ऍक्टिविस्ट (नवी दिल्ली)
२) श्रीमती अर्चना राव – दाक्षिणात्य अभिनेत्री (बेंगलोर)