पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पावसामुळे पिंपळे सौदागर येथील काटे वस्ती, कुंजीर कॉलनी येथे मोठे झाड पार्क केलेल्या कारवर कोसळले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. यावेळी हे झाड पडल्यामुळे महावितरणच्या विजेच्या तारा देखील रस्त्यावर पसरल्या होत्या.

या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक नाना काटे व शत्रुघ्न काटे यांनी तात्काळ महावितरण आणि अग्निशामक दलाला कळवून मदत कार्य सुरू केले. महावितरण आणि अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी वेळेत पोहोचल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, कारवर कोसळलेले झाड अग्निशमन विभागाने काढले असून महावितरण विभागाने देखील विजेच्या तारा हटवले आहे.
























Join Our Whatsapp Group