पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत दोन दिवसापूर्वी रहाटणी येथे दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड झाली होती. ही घटना ताजी असतानाच आज (दि.१६) पहाटे पिंपरीगाव येथील अशोक थिएटर परिसरात अज्ञातांकडून चार वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240710-WA0006-300x300.jpg)
अशोक थिएटर ते पिंपरी गाव रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा अज्ञातांनी दगड तसेच हत्यारांच्या साहाय्याने फोडल्या आहेत. या घटनेत वाहनांच्या काचा फुटल्या असून मोठे नुकसान झाले आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240715-WA0028-300x300.jpg)
आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दहशत पसरवण्यासाठी असे कृत करणाऱ्या गुंडांवर पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/FB_IMG_1720810872131-300x300.jpg)