पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडला सुरुंग लागला आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले अजित गव्हाणे यांच्यासोबत दोन माजी महापौर आणि २० माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, पिंपरी चिंचवड शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलाक्षणा शिलवंत आदी उपस्थित होते.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240710-WA0006-300x300.jpg)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना हा त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का मानला जात आहे काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या पदाचे राजीनामा दिले होते. त्यानंतर आज अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वात शहरातील दोन माजी महापौरांसह २० माजी नगरसेवकांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240715-WA0028-300x300.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक, पदाधिकारी यांची नावे खालील प्रमाणे..
०१) हणमंतरावजी भोसले, माजी महापौर
०२) वैशालीताई घोडेकर, माजी महापौर
०३) पंकज भालेकर, माजी नगरसेवक
०४) प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक
०५) संगीतानानी ताम्हाणे, माजी नगरसेविका
०६) दिवंगत नगरसेविका पौर्णिमाताई सोनवणे यांचे पती रवी आप्पा सोनवणे
०७) दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने
०८) संजय नेवाळे, माजी नगरसेवक
०९) वसंत बोराटे, माजी नगरसेवक
१०) विनयाताई तापकीर, माजी नगरसेविका
११) राहुल भोसले, माजी नगरसेवक
१२) समीर मासुळकर, माजी नगरसेवक
१३) गीताताई मंचरकर, माजी नगरसेविका
१४) संजय वाबळे, माजी नगरसेवक
१५) वैशालीताई उबाळे
१५) शुभांगीताई बोराडे, माजी नगरसेविका
१६) अनुराधा गोफने, माजी नगरसेविका
१७) घनश्याम खेडेकर, माजी नगरसेवक
१८) युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे
१९) शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे
२०) तानाजी खाडे, माजी नगरसेवक
२१) शशिकीरण गवळी, माजी नगरसेवक
२२) युवराज पवार कामगार आघाडी
२३) विशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा
२४) नंदूतात्या शिंदे
२५) शरद भालेकर
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/FB_IMG_1720810872131-300x300.jpg)