पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी गिरीश प्रभुणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्यवाहपदी अॅड. सतीश नानासाहेब गोरडे तर सहकार्यवाहपदी रवींद्र धोंडिबा नामदे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे.
चापेकर स्मारक समितीच्या जुन्या कार्यकारिणीची नुकतीच मुदत संपली होती. त्यामुळे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यासाठी चापेकर वाड्यात कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत गिरीश प्रभुणे यांची एकमताने पुन्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- उपाध्यक्ष शकुंतला विनोद बंसल, कोषाध्यक्ष संजय मनोहर कुलकर्णी, सदस्य मधुसुदन दत्तात्रय जाधव, अशोक माधव पारखी, गतिराम रघुनाथ भोईर, नितीन गजानन बारणे, लक्ष्मण बापू पवार, शरद सोपान जाधव, आसाराम एकनाथ कसबे, सुनीता श्रीकांत शिंदे, निता सुरेश मोहिते, विश्वस्त मुकुंद वासुदेव कुलकर्णी, विलास सुदाम लांडगे, व्यवस्थापक सिध्देश्वर धनराज इंगळे यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारिणीचा कार्यकाल पाच वर्षांचा असणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून रविकांत कळबंकर यांनी काम पाहिले.
यावेळी बोलताना गिरीश प्रभुणे म्हणाले, ”क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या दुस-या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. चापेकर स्मारक समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्मारकाचे काम केले जाणार आहे. या कामास प्रत्यक्षात लवकरच सुरुवात केली जाणार असून सहा मजली इमारत असणार आहे. स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीचे केले जाणार आहे. क्रांतिकारांचे दगडी कोरीव कामामध्ये शिल्प तयार केले जाणार आहे. क्रांतिकारांचे वेगवेगळ्या रुपातील २५ शिल्प साकारले जाणार आहेत. चापेकरांच्या आठवनींना उजाळा दिला जाणार आहे. देशाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने स्मारकाचे काम केले जाणार आहे. देशातील नागरिकांना प्रेरणा मिळेल, अभिमान वाटेल असा स्वरुपाचे स्मारक असणार आहे”.