पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कला व सांस्कृतिक धोरणांतर्गत कविसंमेलन सोमवार दि.२६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नितिन काळजे यांनी केले आहे.
ऑटोक्लस्टर सभागृह चिंचवड येथे या कविसंमेलनाचे उद्घाटन पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट यांच्या शुभहस्ते होणार असून सदरचे कविसंमेलन महापौर नितिन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
प्रमुख उपस्तिथी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अमर साबळे, व विशेष उपस्तिथी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, आदी मान्यवरांसह उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्ष अश्विनी जाधव, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, फ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, यांच्यासह सर्व सन्माननीय पदाधिकारी, नगरसदस्य, नगरसदस्या, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कविसंमेलनामध्ये प्रमुख पाहुणे कविवर्य विसुभाऊ बापट, रमण रणदिवे, संमन्वय समिती सदस्य राजन लाखे, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, सुरेश कंक, पुरुषोत्तम सदाफुले, महेंद्रकुमार गायकवाड, यांच्यासह प्रदिप गांधलीकर, सुहास घुमरे, सविता इंगळे, दीपेश सुराणा, संजय जगताप, सुरेश कंक, नितिन यादव चंद्रकात धस, अशोक कोठारी, पितांबर लोहार, भालचंद्र मगदुम, भुषण नांदुरकर, भाग्यश्री कुलकर्णी प्रकाश परदेशी, बाबु डिसोझा, गीता सुतार, किशोर केदारी, वर्षा बालगोपाल, माधुरी विधाटे, डी.बि.शिंदे, संभाजी बारणे, कैलास भैरट, प्रकाश निर्मळ, डॉ.श्रीकृष्ण जोशी, अनिल दिक्षित,नेहा चौधरी, दत्तु ठोकळे, सिध्दार्थ भोसले, आय.के.शेख, डॉ.मीनल लाड, आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.
हे कविसंमेलन नागरीकंसाठी विनामुल्य असून नागरीकांनी मोठया संख्येने कविसंमेलनाचा लाभ घ्यावा असे अवाहन महापौर नितिन काळजे यांनी केले आहे.